2 – स्ट्रोक V/s 4 – स्ट्रोक ब्रश कटर

२ – स्ट्रोक इंजिन आणि ४ – स्ट्रोक इंजिन

ह्या दोन्हीमधला फरक जाणून घेण्याआधी आपल्याला हे जाणून घेणे गरजेचे आहे कि २ – स्ट्रोक इंजिन आणि ४ – स्ट्रोक इंजिन म्हणजे नेमके काय ? त्यांची रचना कशी असते ? आणि कार्यपद्धती कशी असते ?

आकृती :- २ – स्ट्रोक इंजिन कार्यप्रणाली
                  आकृती :- ४ – स्ट्रोक इंजिन कार्यप्रणाली

२ – स्ट्रोक इंजिन आणि ४ – स्ट्रोक इंजिन म्हणजे नेमके काय ?

२ – स्ट्रोक इंजिन :- पिस्टनच्या दोन स्ट्रोकमध्ये थर्मोडायनामिक सायकल पूर्ण होत असल्याने  २ – स्ट्रोक इंजिनमध्ये, क्रॅंक शाफ्टच्या प्रत्येक रोटेशनमध्ये पॉवर स्ट्रोक असतो. वरील कारणांमुळे, फिरण्याचा क्षण अधिक एकसमान असतो. त्यामुळे दोन स्ट्रोक इंजिनच्या बाबतीत हलक्या वजनाच्या फ्लाय व्हीलचा वापर केला जातो.

४ – स्ट्रोक इंजिन :- ४ – स्ट्रोक इंजिनमध्ये, पिस्टनच्या चार स्ट्रोकमध्ये एक थर्मोडायनामिक सायकल पूर्ण होते त्यामुळे क्रॅंक शाफ्टच्या प्रत्येक दोन रोटेशनमध्ये एक पॉवर स्ट्रोक असतो. वरील कारणांमुळे, फिरण्याचा क्षण कमी एकसमान आहे. त्यामुळे ४ – स्ट्रोक इंजिनच्या बाबतीत जड फ्लाय व्हीलचा  वापर केला जातो.

२ – स्ट्रोक इंजिन आणि ४ – स्ट्रोक इंजिन मधील मुख्य फरक :-

  • क्रॅंक शाफ्टच्या प्रत्येक रोटेशनमध्ये पॉवर स्ट्रोक मिळविण्याच्या क्षमतेमुळे, आकार समान असल्यास ४ – स्ट्रोक इंजिनच्या तुलनेत २ – स्ट्रोक इंजिनपासून  उत्पादित शक्ती जास्त मिळते. म्हणजेच जास्त आर.पी.एम मिळते.
  • २ – स्ट्रोक इंजिनसाठी कोणतीही झडप प्रणाली ( valve system ) वापरली जात नाही, यामुळे कार्यकुशलता आणि डिझाइन अधिक सुलभ होते. झडप यंत्रणा नसल्यामुळे, २ – स्ट्रोक इंजिनचे वजन कमी आणि  इंजिनची प्रारंभिक उत्पादन किंमत कमी असते.
  • वरील सर्व कारणांमुळे ४ – स्ट्रोक इंजिन हे ट्रक्टर चलित उपकरणांसाठी व अवजड कामांसाठी  अधिक फायदेशीर ठरते तर २ – स्ट्रोक इंजिन हे शेतीमधील कामे जसे कि निंदणी, कोळपणी, तण नियंत्रण, माती खाली वर करणे, छोटी झुडपे कापणे, ढेकळ फोडणे इत्यादी कामांसाठी अधिक कुशलतेने कार्य करते.

निष्कर्ष :- वरील सर्व बाबींचा अभ्यास केल्यानंतर असे लक्षात येते कि जास्त शक्ती आणि वजनाने हलके असल्याने २ – स्ट्रोक इंजिन हे एका माणसाने काम करावयाच्या शेतीविषयक यंत्रांसाठी, जसे कि ब्रश कटर अधिक फायद्याचे ठरते.

2 thoughts on “2 – स्ट्रोक V/s 4 – स्ट्रोक ब्रश कटर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *