हिरा अॅग्रो इंडस्ट्रीज ही संपुर्ण महाराष्ट्रातील ठिबक सिंचन क्षेत्रातील उत्पादने बनवणारी एक नामांकित व अग्रेसर कंपनी आहे. हिरा अॅग्रो इंडस्ट्रीज ही महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, कर्नाटक आणि तामिळनाडू ह्या राज्यातही उत्कृष्ट काम करते. कंपनी महाराष्ट्रात आणि इतरत्र एक आदरणीय प्रतिष्ठा राखुन आहे.कंपनी ही प्रत्येक काम, बदल आणि नवीन कल सांभाळुन शेतक-यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी करते. हिरा अॅग्रो इंडस्ट्रीजची स्थापना सन २००३ मध्ये श्री नंदू खडके यांनी केली आणि आता हा व्यवसाय श्री गिरीश नंदू खडके पुढे चालवत आहेत. हिरा अॅग्रो इंडस्ट्रीजची सध्याची उलाढाल रु. ५ कोटींपेक्षा जास्त होईल. कंपनीची सुरूवात एका लहानश्या भाड्याच्या जागेत एका एक्स्ट्रुजन लाइन सोबत करण्यात आली.